हवाना – क्युबा देशामध्ये एका अनोख्या चोरीची घटना घडली आहे. क्युबामध्ये चिकन म्हणजे कोंबडीचे मांस हे रेशन दुकानातही मिळते. हे मांस ठेवलेल्या शीतगृहातून तब्बल १३३ टन चिकन ३० चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. तपासात ४० जणांनी हे चिकन चोरल्याचे आणि या पैशातून त्यांनी फ्रिज, लॅपटॉप, टीव्ही, एअर कंडिशनर असा ऐवज खरेदी केल्याचे उघडकीस आले.
हे चिकन सरकारी कोल्ड स्टोअरमधून ठेवण्यात आले होते.क्युबातील प्रत्येक नागरिकाला अन्न मिळावे या उद्देशाने फिडेल कॅस्ट्रोच्या क्रांतीनंतर हे शीतगृह ६० वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते.लोकांना अन्न पुरवणाऱ्या या सरकारी संस्थेचे संचालक रिगोबर्टो मुस्टेलियर यांनी सांगितले की,चोरलेल्या कोंबडीचे प्रमाण हे मध्यम लोकसंख्येच्या राज्याच्या एका महिन्याच्या रेशनच्या बरोबरीचे होते. मांस चोरणार्या ३० चोरट्यांमध्ये कंपनीचे कर्मचारी,आयटी विभागातील कर्मचारी, सुरक्षारक्षक, बॉसेस आणि कंपनी बाहेरील काही लोकांचा समावेश होता. रात्री १२ ते २ यावेळेत ही चोरी करण्यात आली होती.हे चिकन १६६० खोक्यामध्ये भरून एकाच रात्रीत लंपास केले होते.