क्वालकॉमच्या अमेरिकेतील कंपनीत नोकर कपात होणार

सॅन फ्रान्सिस्को – जगातील सर्वांत मोठ्या मायक्रोचीपची निर्मिती करणाऱ्या क्वालकॉम कंपनीने आपल्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील दोन कार्यालयांमधील १२५८ कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली आहे.साधारण १३ डिसेंबरच्या आसपास ही नोकरकपात लागू होण्याची शक्यता आहे.

या कंपनीने कॅलिफोर्नियातील एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला याबाबत माहिती दिली आहे. यात कंपनीने म्हटले आहे की, कंपनीच्या सॅन डिएगो कार्यालयातील सुमारे १०६४ आणि सांता क्लारामधील १९४ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाणार आहे. दोन्ही कार्यालयातील नोकरकपात १३ डिसेंबरच्या आसपास लागू होईल.या कंपनीला घटत्या महसुलाचा सामना करावा लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या कंपनीत तब्बल ५१ हजार कामगार काम करत आहेत.या नोकर कपातीचा अन्य कर्मचाऱ्यांवर काही परिणाम होणार नाही. त्यांच्या सोयीसुविधा कमी केल्या जाणार नाहीत. या कंपनीने अ‍ॅपल सोबत २०२६ पर्यंत ५ जी चिप्सचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेऊन एक महिना होत नाही, तोच ही नोकर कपातीची घोषणा करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top