गंगोत्री धामाची दारं १४ नोव्हेंबरपासून भाविकांसाठी बंद

गंगोत्री धामाची दारं १४ नोव्हेंबरपासून भाविकांसाठी बंद केली जातील,अशी माहिती मंदिर समितीनं दिली आहे. गोवर्धन पूजेनंतर गंगा देवीला समर्पित या मंदिराची दारं भाविकांना दर्शनासाठी बंद केली जातील असं समितीनं एका पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. हिवाळी हंगामात हे मंदिर ६ महिन्यांसाठी बंद ठेवलं जातं.यमुनोत्री धामाची दारं देखील १५ नोव्हेंबरपासून बंद करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top