गर्भपात घटनात्मक अधिकार फ्रान्सचे ऐतहासिक विधेयक

पॅरिस

गर्भपात महिलांचा घटनात्मक अधिकार आहे, या ऐतिहासिक विधेयकाला फ्रान्सच्या संसदेमध्ये बहुमताने मंजूरी देण्यात आली आहे. गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला आहे. फ्रान्सने आपल्या राज्यघटनेत गर्भपाताच्या अधिकाराचा समावेश केला आहे. .

महिलांना गर्भपाताचा अधिकार बहाल करण्यासाठी फ्रान्सच्या राज्यघटनेच्या कलम ३४ मध्ये सुधारणा करणारे विधेयक मांडण्यात आले होते. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर महिलांना गर्भपाताचा घटनात्मक अधिकार देणारा प्रस्ताव मांडला होता. फ्रान्समधील पॅलेस ऑफ व्हर्सेलीसमध्ये या प्रस्तावावरील मतदानासाठी दोन्ही सभागृहातील सदस्य उपस्थित होते. अधिवेशनात हा प्रस्ताव ७८० विरुद्ध ७२ अशा फरकाने मंजूर करण्यात आला. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन यांनी सांगितले की, ‘गर्भपात हा महिलांसाठी घटनात्मक अधिकार असेल, असेल असे मी वचन दिले होते. त्यानंतर काल संसदेच्या दोन्ही विशेष सभागृहात गर्भपाताला घटनातमक अधिकाराचा दर्जा देण्यात आला.’ महिलांना गर्भपात करण्याचा घटनात्मक अधिकार देणारा फ्रान्स हा जगातील एकमेव देश ठरला आहे. यानुसार, गर्भपात करण्याचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य महिलांना देण्यात आले आहे.

फ्रान्समधील विधेयक मंजूर होताच गर्भपाताला पाठिंबा देणाऱ्या महिला कार्यकर्त्या सेंट्रल पॅरिस येथे जमा झाल्या. यावेळी त्यांनी एकच जल्लोष केला. त्यांच्या हातामध्ये माझे शरीर, माझी निवड असे लिहिलेली पोस्टर दिसत होती. या ऐतिहासिक निर्णयाचे जागतिक महिला हक्क गटांनीही स्वागत केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top