गर्लफ्रेंडची हत्या करणाऱ्या ‘ब्लेड रनर’खेळाडूला पॅरोल

सँडटन – दक्षिण अफ्रिकेचा प्रसिद्ध माजी पॅरालंम्पिक खेळाडू ऑस्कर पिस्टोरियसला २०१४ मध्ये गर्लफ्रेंड रीवा स्टीनकॅम्पची हत्या केल्याप्रकरणी जेल झाली होती. या स्टार खेळाडूला ५ जानेवारी २०२४ पॅरोल मंजूर होणार आहे. त्यामुळे तो जेलमधून सुटणार आहे. ब्लेड रनर या नावाने देखील ओळखला जाणाऱ्या ऑस्करने २०१३ मध्ये त्याची गर्लफ्रेंड रीवाची हत्या केली होती.
ऑस्कर पिस्टोरियसने दावा केल्याप्रमाणे त्याने गर्लफ्रेंड रीवाला चोर समजून गोळ्या झाडल्या होत्या. मात्र सुनावणीदरम्यान समोर आलेल्या अनेक अहवालानुसार रीवा ही ऑस्करसोबत रात्री उशिरा झालेल्या भांडणानंतर बाथरूमकडे पळाली होती. यावेळी तिला चोर समजून ऑस्करने रागाच्या भरात तिच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. सुरूवातीच्या काळात ऑस्कर पिस्टोरियसला ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. मात्र अनेकवेळा त्याची केस पुन्हा तपासल्यानंतर त्याची शिक्षा वाढवून १३ वर्षे करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top