गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा ससूनमधून फरार

पुणे- कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकी देणारा आरोपी पोलिसांना गुंगारा देत ससून रुग्णालयातून फरार झाल्याने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली. मार्शल लुईस लीलाकर असे फरार आरोपीचे नाव आहे. सोशल मिडीयावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळला धमकवल्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी त्याला पुणे पोलिसांनी अटक केली होती.
लीलाकरने आज पहाटे पोटात दुखत असल्याचा बहाणा केला. त्यानंतर येरवडा जेलमधून त्याला ससून रुग्णालयामध्ये औषधोपचारासाठी आणण्यात आले. यावेळी त्याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढला. लीलाकरच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी ८ पथके पाठवली असून त्याचा पोलीस त्याचा शोध घेत आहे. मात्र या प्रकरणानंतर पुणे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही महिन्यांपूर्वी ड्रग माफिया ललित पाटील हा पोलिसांच्या हातावर गुंगारा देऊन पसार झाला होता. त्यानंतर ड्रगचे मोठे रॅकेट समोर आले होते.ससून रुग्णालयात उपचार घेत असताना ललितला एक्स-रेसाठी नेत असताना त्यांने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top