गुगलकडून गुप्त माहिती डिलीट करण्यास मान्यता

ऑकलंड –
नागरिकांची आपल्याकडे असलेली गुप्त माहिती डिलीट करणार असल्याचे गुगलने ऑकलंडच्या न्यायालयात झालेल्या तडजोडीत मान्य केले आहे. त्यानंतर आपल्याकडील कोट्यवधी लोकांचा गुप्त डेटा डिलीट करण्यास गुगलने सुरुवात केली आहे. गुगलविरोधात कटला दाखल झाल्याने कंपनीला ही कारवाई कारावी लागली.

खातेदारांकडून प्रायव्हेट ब्राऊजिंग मोड वापरल्यानंतरही गुगलकडे हा डेटा जमा होत होता. खातेदारांना असे वाटत होते की त्याचा हा डेटा गुप्त आहे. या संदर्भात गुगलवर कॅलिफोर्निया राज्यातील ऑकलंडच्या न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी काल होऊन गुगलने न्यायालयीन तडजोडीला मान्यता दिली. याबाबत खातेदारांना नुकसानभरपाई जरी मिळणार नसली तरी ज्यांना ती हवी असेल ते वेगळ्या खटल्याद्वारे नुकसानभरपाई मागू शकतात यावरही एकमत झाले आहे. यासंदर्भातील कारवाई ही २०२० मध्ये सुरू झाली होती. १ जून २०१६ पासूनच गुगलवर हे गुप्त ब्राऊजिंग सुरू होते. तरीही गुगलवर वापरकर्त्यांना येणाऱ्या कुकीज व इतर गोष्टींवरून त्यांचा गुप्त डेटा वापरत जात असल्याचे दिसून येत होते. गुगल लोकांच्या गुप्त माहितीचा मोठा स्रोत आहे. सर्वसामान्याची मोठी माहिती गुगलकडे होती. यामध्ये त्यांचा मित्रपरिवार, आवडीचे पदार्थ, छंद, खरेदीची आवड याचबरोबर खासगी माहितीचाही समावेश होता. न्यायालयात झालेल्या तडजोडीनंतर गुगलने हा सर्व डाटा डिलीट करायचे मान्य केले आहे. यापुढे गुगल नागरिकांकडून माहिती का घेतली जात आहे, याची कारणे देणार असून लोकांना कुकीज ब्लॉक करण्याचे अधिकार मिळणार आहेत. या प्रकरणी गुगलला लावलेल्या दंडाची रक्कम ५ कोटी डॉलर पर्यंत जाऊ शकतेस अशी माहिती याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top