गांधीनगर – गुजरातमध्ये गेल्या तीन आठवड्यापासून चांदीपुरा व्हायरसचा अक्षरशः कहर सुरू आहे. गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या व्हायरसची लागण होऊन ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
सुरतमध्ये चांदीपुरा व्हायरसची लागण झालेला पहिला संशयित रुग्ण आढळला होता. झोपडपट्टी भागात राहाणाऱ्या एका ११ वर्षीय मुलीला खूप ताप आणि उलट्या होत असल्याने तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर राजकोट, सांबरकांठासह विविध जिल्ह्यात १२४ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ५४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून २६ जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आला आहे. गुजरात व्यतिरिक्त राजस्थानमध्येही या व्हायरसची लागण झालेले ६ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ५ जणांवर उपचार सुरू आहेत.