गुरुवारी विनायक राऊत सावंतवाडीत गाव भेटीवर

सावंतवाडी- लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने राऊत यांनी आपल्या प्रचाराला गावभेटीने सुरुवात केली आहे.राऊत हे गुरुवार ४ एप्रिल रोजी सावंतवाडी तालुक्यात गाव भेट दौऱ्यावर येणार आहेत अशी माहिती तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली.

विनायक राऊत हे गुरुवार ४ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता सोनुर्ली,
साडेअकरा वाजता शेलेन, दुपारी साडेबारा वाजता डिंगणे,दुपारी अडीच वाजता अस्निये,दुपारी साडेतीन वाजता भालावल,दुपारी सव्वाचार वाजता सातुळी-बावळट,सायंकाळी सव्वापाच वाजता देवसू, संध्याकाळी सहा वाजता पारपोली,संध्याकाळी सव्वा सातवाजता वाजता वेर्ले, रात्री आठ वाजता सावरवाड आणि रात्री दहा वाजता निरवडे या गावांना भेटी देणार आहेत.यावेळी सावंतवाडी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top