Home / News / गोव्यातील महापालिकांचे सर्व व्यवहार होणार ऑनलाईन !

गोव्यातील महापालिकांचे सर्व व्यवहार होणार ऑनलाईन !

पणजी – गोव्यातील सर्व महापालिकांच्या सर्व प्रकारच्या सेवा १५ दिवसांच्या आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.ही प्रक्रिया ऑनलाईन झाल्यानंतर एकही अर्ज...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पणजी – गोव्यातील सर्व महापालिकांच्या सर्व प्रकारच्या सेवा १५ दिवसांच्या आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.ही प्रक्रिया ऑनलाईन झाल्यानंतर एकही अर्ज प्रत्यक्षात पालिका स्विकारणार नाही,अशी माहिती नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

नगरविकास मंत्री राणे यांनी गोव्याच्या सर्व पालिकांच्या मुख्य अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेतली होती.या बैठकीत पालिका कारभार ऑनलाईन करण्याचा निर्णय घेऊन मंत्र्यांनी या विषयीची सविस्तर माहिती दिली.मंत्री राणे यांनी सांगितले की, जन्म दाखला, घरपट्टी आणि व्यावसायिक शुल्क आता ऑनलाईन भरावे लागणार आहे.यासाठी पालिकेत प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. बहुतेक पालिकांनी आपले व्यवहार ऑनलाईन सुरू केलेले आहेत आणि काही पालिका उरलेल्या आहेत त्या येत्या १५ दिवसांच्या आत ऑनलाईन पध्दत अवलंबणार आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या