‘गो फर्स्ट’चे व्यवस्थापकीय संचालक कौशिक खोना यांचा राजीनामा

मुंबई

‘गो फर्स्ट’ या विमान कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (सीईओ) कौशिक खोना यांनी राजीनामा दिला आहे. गो फर्स्टच्या विमानांची सर्व उड्डाणे निलंबित केल्यानंतर आणि कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर सुमारे ७ महिन्यांनी खोना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काल एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये ३० नोव्हेंबर हा माझा कंपनीतील शेवटचा दिवस आहे, असे खोना यांनी म्हटले.

ऑगस्ट २०२० मध्ये कौशिक खोना हे गो फर्स्टमध्ये सीईओ म्हणून परत आले होते. त्यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या ई-मेलमध्ये म्हटले की, ‘जड अंतःकरणाने मी तुम्हाला कळवत आहे की, आज माझा कंपनीबरोबरचा शेवटचा दिवस आहे. मला ऑगस्ट २०२० मध्ये पुन्हा एकदा गो फर्स्टसाठी काम करण्याची संधी मिळाली. तुमच्या सक्षम आणि सक्रिय पाठिंब्यामुळे मी माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. मला आशा आहे की, आपली प्रार्थना ऐकली जाईल आणि कंपनी पुन्हा सुरू होईल. सर्व कर्मचार्‍यांना त्यांचा थकीत पगार मिळावा म्हणून नव्हे तर कंपनीचे कामकाज पुन्हा सुरू व्हावे, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु मला यात अपयश आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top