ग्रामपंचायत निवडणुकांचे अर्ज भरण्याच्या वेळेत वाढ

मुंबई – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ पर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र, आता या वेळेत बदल करण्यात आला असून ती सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत वाढवली आहे. राज्यभरातील सुमारे २,३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २,९५० सदस्यपदांच्या, तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ०५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती.

या नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्यात येणारे घोषणापत्र संगणक प्रणालीद्वारे भरले जात होते, मात्र त्याची प्रत काढताना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे आल्या होत्या. त्या अडचणी आता दूर केल्या आहेत. त्यामुळे नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या उर्वरित कालावधीतील मुदत २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ ऐवजी आता सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० अशी केली आहे. अन्य प्रक्रिया पूर्वघोषित कार्यक्रमाप्रमाणे पार पडेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top