आंबेगाव – तालुक्यातील घोडेगाव परिसराचे ग्रामदैवत असलेल्या तिर्थक्षेत्र स्वयंभू श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान मंदिराला नुकताच तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाला आहे. त्यासाठी १ कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे,अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत काळे आणि कोषाध्यक्ष राजेश काळे यांनी दिली.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून पर्यटन विकास अंतर्गत १ कोटी रुपये निधी हा श्री हरिश्चंद्र महादेव मंदिर, भोजन गृहासाठी व परिसर विकासासाठी खर्च केला जाणार आहे.श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते.येथील कुस्त्यांचा आखाडा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यात्रा उत्सव काळात भजन स्पर्धा या ठिकाणी होत असतात.हे महाकालीचे मंदिर आहे. देवीची मूर्ती पद्मासनात असून योग मुद्रेत स्थानापन्न झालेली आहे. परंपरेनुसार देवीसमोर भैरव जगदंबेला आळवणी करीत आहे. कुठेही न दिसणारी ज्ञानदानाच्या भाव मुद्रेतील श्री दत्तात्रयांची मूर्तीही येथे पाहवयास मिळते.