Home / News / चारा कडबा कुट्टी करताना विजेचा शॉक! पिता-पुत्र ठार

चारा कडबा कुट्टी करताना विजेचा शॉक! पिता-पुत्र ठार

लातूर – शेतात यंत्राच्या साहाय्याने जनावरासाठी चारा कडबा कुट्टी करत असताना अचानक विजेचा शॉक लागून पिता- पुत्राचा जागीच मृत्यू झाला.ही...

By: Team Navakal

लातूर – शेतात यंत्राच्या साहाय्याने जनावरासाठी चारा कडबा कुट्टी करत असताना अचानक विजेचा शॉक लागून पिता- पुत्राचा जागीच मृत्यू झाला.ही घटना काल बुधवारी औसा तालुक्यातील नागरसोगा येथे घडली.

नागरसोगा येथील शेतकरी तानाजी विश्वनाथ मुसांडे (५०) व त्यांचा मुलगा कृष्णा तानाजी मुसांडे (२५) हे दोघे पिता-पुत्र आपल्या गावाशेजारी असलेल्या शेतात जनावरांना चारा देण्यासाठी यंत्राच्या साहाय्याने कडबा कुट्टी करत होते. या यंत्रामध्ये विद्युत पुरवठा प्रवाहित झाल्याने दोघांनाही विजेचा जोरदार झटका लागला. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याबाबत औसा पोलिसात अकस्मात मृत्यूची गुन्हा म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts