जगप्रसिद्ध कास पठारावर आज फुलोत्सवाचे उद्घाटन

सातारा- जगप्रसिद्ध कास पठारावरील फुलांचा बहर उद्या गुरुवार ५ सप्टेंबरपासून सर्वांना पाहता येणार आहे.खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्या गुरुवारी कास पठारावरील फुलोत्सवाचे अधिकृत उद्घाटन होणार आहे.

जागतिक वारसास्थळाचा मान मिळालेल्या कास पठारावर सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून वेगवेगळ्या प्रकारची फुले उमलण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटकांची गर्दीही हळूहळू वाढत चालली आहे. त्यामुळे कास पठार कार्यकारिणी समितीने तातडीने हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या फुलोत्सवाचे उद्घाटन होणार असले तरी कास पठाराचे ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना १० सप्टेंबरपासून ऑनलाईनची सुविधा वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क १५० रुपये, गाईड फी ४५ मिनिटाला १०० रुपये, उपद्रव शुल्क दोन हजार रुपये,बारा वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश आणि शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ४० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. कास पठारावर १३० कर्मचारी सेवेत असून पर्यटकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर राहणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top