जय जय शिवशंकर गाण्याने प्रसिध्द झालेले मंदिर आगीत खाक


श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिध्द पर्यटन स्थळ असलेले गुलमर्ग येथील टेकडीवरील १०९ वर्षे जुने शिवमंदिर आगीत जळून खाक झाले आहे. या मंदिराच्या परिसरात बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले. बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री मुमताज यांच्यावर चित्रित झालेले आणि आजही रसिकांच्या ओठावर असलेले जय जय शिवशंकर , काँटा लगे ना कंकर हे अजरामर गीत याच मंदिरात चित्रित करण्यात आले होते. बुधवारी सकाळी या मंदिराला आग लागली. त्यात हे मंदिर पूर्णपणे जळून खाक झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top