जळगाव जिल्ह्यात आढळला नव्या कोरोनाचा पहिला रुग्ण !

जळगाव – राज्यातील कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असताना आता जळगाव जिल्ह्यात देखील जेएन१ कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे.जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गावात ४३ वर्षीय रुग्णाचा काल सोमवारी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला.गेल्या ३ दिवसांत एकूण ७९४ चाचण्यांमधून एक रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण काही दिवसांपूर्वी नेपाळवरून आला होता.
या रुग्णाला १३ डिसेंबर रोजी ताप,खोकला व श्वासाचा त्रास जाणवू लागला.त्याने २० डिसेंबर रोजी एका खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतला. त्यावेळी केलेल्या चाचणीत त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.हा रुग्ण ६ ते १० डिसेंबरच्या कालावधीत नेपाळला गेला होता.त्याला सध्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र एक महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या संपर्कातील १४ जण हे निगेटिव्ह आले आहे. रूग्णांची प्रकृती उत्तम आहे. एचआरसीटी रिपोर्ट २४ आहे.त्यामुळे चिंतेचे कारण नाही.या सर्व परिस्थितीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद लक्ष ठेवून आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top