जागतिक सरासरी तापमान वाढ कमी करण्याचे प्रयत्न असफल

लंडन- गेल्या काही वर्षांत मानवी हस्तक्षेप,प्रदूषण , जंगलतोड आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन यामुळे जागतिक सरासरी तापमान बरेच वाढले आहे.हे तापमान नियंत्रणात ठेवण्यात गेल्यावर्षी २०२३ मध्ये अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे.कारण फेब्रुवारी २०२३ ते जानेवारी २०२४ या काळात पृथ्वीचे सरासरी तापमान १.५२ अंश सेल्सिअसने वाढले आहे,अशी माहिती युरोपियन युनियन कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने दिली आहे.
१८५० ते १९०० या वर्षांमध्ये जागतिक सरासरी तापमानवाढ अर्धा अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. हेच तापमान १.५ अंश सेल्सिअसपर्यंत अनेक वर्षे स्थिर होते.ते कमी करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप आणि जीवाश्म इंधनांचे ज्वलन यामुळे ही सरासरी तापमानवाढ काही कमी करता आली नव्हती. विशेष म्हणजे गेल्यावर्षी हवामानातील अल-निनोमुळे त्यात आणखी भर पडली आणि तापमानवाढ नियंत्रणाबाहेर गेली.तरीही सध्याच्या अनियंत्रित जागतिक तापमानवाढीच्या परिस्थितीला मानवी हस्तक्षेपच जबाबदार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top