जेईई मेन्‍स परीक्षा आजपासून सुरु होणार परीक्षा केंद्रांवर विविध सत्रांत आयोजन

नाशिक

नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे जॉइंट एंट्रान्‍स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स २०२४ परीक्षेच्‍या द्वितीय सत्राला उद्यापासून सुरवात होत आहे. परीक्षेला प्रविष्ट झालेल्‍या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिलेले आहे. राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्‍स परीक्षेचा पेपर क्रमांक एक हा ४ ते ९ एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे.

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या लॉगइन आयडीच्‍या साहाय्याने प्रवेशपत्र प्राप्त करून देता येईल. या प्रवेशपत्रावर संबंधित विद्यार्थ्यांच्‍या परीक्षेची तारीख, वेळ आणि परीक्षा केंद्राचे नाव व पत्ता असा सर्व तपशील देण्यात येणार आहे. सकाळ सत्रात सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत आणि दुपारच्‍या सत्रात दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) ही परीक्षा होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेच्‍या दोन संधी उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. यापैकी पहिल्‍या सत्रातील परीक्षा जानेवारी महिन्‍यात पार पडली होती, तर आता एप्रिलमध्ये दुसऱ्या सत्रातील परीक्षा होत आहे. या दोन्‍ही परीक्षांमधील सर्वोत्‍कृष्ट कामगिरी ग्राह्य धरुन राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता यादी तयार केली जाणार असून, त्‍याआधारे राष्ट्रीय क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top