जेएनपीए अतिरिक्तजमीन विकणार

उरण – जवाहलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट प्रधिकरण आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रात असलेली अतिरिक्त जमीन विकणार आहे. या डिसेंबर महिन्यात या जमिनीसाठी लिलाव प्रक्रिया होणार आहे. ही जमीन उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना विकण्याला प्राधान्य देण्यात येणार असून काही जमिनी सेवा क्षेत्रालाही देण्यात येणार आहेत.या बाबत जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सांगितले आहे की, आमच्याकडे विक्रीयोग्य १६५ हेक्टर जमीन असून त्यातील २५ टक्के सुरुवातीला विकण्यात येणार आहे. या आधी गोदामांसाठी मोठ्या प्रमाणावर जमिनी देण्यात आल्या होत्या. आता आम्ही लहान उत्पादक आस्थापनांना व खास करुन जे या बंदरावरुन मालाची आयात निर्यात करणार आहेत त्यांच्यासाठी या जागा देणार आहोत. ज्या भूखंडाच्या विक्रीसाठी हे लिलाव होणार आहेत, त्यात उत्पादन क्षेत्रातील कंपन्या व सेवा क्षेत्रातील कंपन्यांसाठीच्या भूखंडांचा समावेश आहे.