टेम्पोची झाडाला धडक अपघातात चालक ठार

कर्नाटक

वैद्यकीय सामग्री व औषधांची वाहतूक करणारा मालवाहू टेम्पो झाडाला धडकल्याने अपघात झाला. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बेळगावाच्या रामनगर-धारवाड मार्गावरील नागरगाळी नजीक असणाऱ्या वन खात्याच्या विश्राम धामसमोर हा अपघात झाला. या अपघातात चालक सय्यद निजाम (वय १९) जागीच ठार झाला. तर चालकासोबत असणारे माज शेख (वय १९) आणि तोहीर शेख (वय १९) दोघेही जखमी झाले आहेत.

टेम्पो चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. ह्या अपघातात टेम्पो इतक्या जोराने झाडाला धडकला की, अपघातानंतर चालक निजाम याचा मृतदेह वाहनातच अडकून पडला. त्यानंतर लोंढा येथून क्रेन मागवून मृतदेह बाहेर काढण्यात आला. याच मार्गावरील मुंडवाड क्रॉस जवळ आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास राज्य परिवहनच्या बेळ्ळारी-पणजी बसला अपघात होऊन बस पलटी झाली. या अपघातात एक महिला जखमी झाली आहे. दोन्ही अपघात लोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top