ट्रम्प यांनी कमला हॅरीस यांचा उल्लेख ‘कम्बला’ असा केला

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांचा उल्लेख डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘कम्बला’ असा केल्याने सोशल मीडियावर ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमॉक्रेटीक पार्टीच्या उमेदवार, विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांच्यात अध्यक्षपदासाठी थेट लढत होणार आहे. ट्रम्प आपल्या प्रत्येक प्रचारसभेत कमला हॅरीस यांच्या परदेशी वंशाचा मुद्दा उकरून श्वेतवर्णीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कमला हॅरीस या भारतीय वंशाच्या आहेत. त्यावरून ट्रम्प त्यांच्यावर निशाणा साधत आहेत.’कम्बला’ हा भारतात कर्नाटक राज्यात साजरा होणारा हिंदुंचा सण आहे. कमला यांना ‘कम्बला’ असे संबोधून त्या मूळच्या भारतीय आहेत असे सुचविण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला आहे. त्यामुळेच ट्रम्प यांच्यावर वांशिक द्वेष पसरविण्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे.