ठाणे सत्तरी गावात रंगला १४ घोड्यांचा नृत्याविष्कार

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील ठाणे सत्तरी गावामध्ये शिमग्यातील घोडेमोडणी उत्सव नुकताच थाटात साजरा करण्यात आला.यामध्ये रात्रीच्यावेळी १४ घोड्यांचा नृत्याविष्कार पाहण्यासाठी भाविक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

ठाणे सत्तरी गावात मंडळगिरो कोळीगिरो देवस्थानचा त्रैवार्षिक घोडेमोडणी उत्सव आयोजित करण्यात आला होता. या देवस्थानच्या दर्शनासाठी भाविकांनी दुपारपासूनच रांग लावली होती. यातील पारंपारिक घोडेमोडणी उत्सवाला दुपारी तीन वाजता सुरुवात झाली. हा उत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळी १४ घोड्यांचा नृत्याविष्कार आणि पारंपारिक वादन करण्यात आले.या उत्सवात सार्वजनिक सांगणे घालण्याची आणि देवाला नवस करून गार्‍हाणे घालण्याची पद्धत आहे. हा कार्यक्रम तीन तास आयोजित करण्यात आला होता.या उत्सवामध्ये आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि आमदार डॉ.दिव्या राणे यांचाही सहभाग होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top