डॉल्बी, लेझर, प्लाझ्मावर निर्बंध घालण्याची मिरजकरांची मागणी

मिरज- अलीकडे शहरामध्ये विविध कारणांमुळे काढल्या जाणार्‍या मिरवणुकांमध्ये डॉल्बी,लेझर,प्लाझ्मा या साधनांचा सर्रास वापर केला जात आहे.मात्र त्याचा लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे मिरवणुकामध्ये अशा साधनांवर निर्बंध घालावेत,अशी मागणी मिरजकरांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात मिरजेतील महेश कुलकर्णी,मोहन वाटवे,विराज कोकणे,सुधीर गोरे,ओंकार शुक्ल,मिलिंद भिडे यांच्यासह काही मिरजकर नागरिकांनी पालकमंत्री खाडे यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही वर्षापासून अनेक मिरवणुकांमध्ये कायदे धाब्यावर बसवून ध्वनिप्रदूषण वाढत चालले आहे.कर्णकर्कश आवाजात डॉल्बीचा आवाज धुमाकूळ घालत आहे.डोळ्यांना हानी पोहोचवणारे लेझर किरण सोडणारे लाईट वापरले जात आहेत.त्याचप्रमाणे प्लाझ्मा लावून कानठळ्या बनविणारा आवाज काढला जात आहे.या सर्वांवर आता निर्बंध घालण्याची वेळ आली.तशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना द्याव्यात,अशी मागणी मिरजकरांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top