डोनाल्ड ट्रम्प यांनी भरला १७५ दशलक्ष डॉलर दंड

मॅनहटन –
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फेब्रुवारी मध्ये ठोठावण्यात आलेल्या ४५४ दशलक्ष डॉलरच्या दंडापैकी त्यांनी हटनच्या कोर्टात आज १७५ दशलक्ष डॉलरचा भरणा रोख्यांच्या स्वरुपात केला. मॅनहटनच्या कोर्टात त्यांनी या रोख्यांचा भरणा केल्याने त्यांच्या मालमत्तेवरी, जप्तीची कारवाई तुर्तास टळली आहे.

ट्रम्प यांनी हे रोखे भरले असल्याची माहिती त्यांच्या वकील अलीना हब्बा यांनी दिली. ट्रम्प यांना संपूर्ण रकमेचे रोखे मिळण्यात अडचण येत होती. त्यांना त्यांच्या पूर्ण दंडाच्या रकमेच्या १२० टक्के रक्कम रोख जमा केल्यानंतरच रोखे मिळणार होती. न्यायालयात ट्रम्प यांनी ही बाब न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिल्यावर न्यायालयाने २५ मार्च रोजी त्यांना कमी रकमेचे रोखे भरण्याची परवानगी दिली. ट्रम्प यांनी भरलेले रोखे लॉस एंजलीसच्या काईट स्पेशलिटी इन्शुरन्स कंपनीने उपलब्ध करून दिले. तुलनेने लहान असलेल्या या कंपनीने हे रोखे उपलब्ध करुन दिले आहेत.

ट्रम्प म्हणाले की, आपल्यावरील पूर्ण दंडाची रक्कम जमा करणे शक्य नाही. यासाठी माझी सर्व संपत्ती गहाण ठेवून त्या बदल्यात रोख रक्कम मिळवून मला रोखे घ्यावे लागतील, जे शक्य नाही. या निर्णयाविरोधात आपण अपिलात जाणार असून माझ्यावर अन्याय पद्धतीने आकारण्यात आलेला दंड कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.

ट्रम्प यांच्याकडून पूर्ण रकमेचेच बाँड घ्यायला हवे होते असे त्यांच्या विरोधात दावा दाखल करणारे न्युयॉर्कचे अटर्नी जनरल लेटिटिया जेम्स यांनी म्हटले आहे. ते जर अपिलात हरले तर ते दंड व व्याज भरतील याबाबत आपल्याला विश्वास नाही असे त्या म्हणाल्या. ट्रम्प यांच्यावर इतरही चार फौजदारी खटले सुरु आहेत. ट्रम्प यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचा इन्कार केला असून हे सर्व आरोप प्रचार रोखण्यासाठी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top