तामिळी चित्रपट दिग्दर्शक वेत्री याचा मृतदेह सापडला

चेन्नई – तामिळी चित्रपट दिग्दर्शक वेत्री दुरायसामी यांचा मृतदेह तब्बल नऊ दिवसांनी सापडला आहे. हिमाचल प्रदेशमधील सतलज नदीत त्यांचा मृतदेह आढळून आला. ४ फेब्रुवारी रोजी ते आपल्या एका मित्रासोबत कारमधून जात असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार राष्ट्रीय महामार्ग क्र.५ लगतच्या लहौल -स्पिती परिसरात नदीत कोसळली.तेव्हापासून बचाव पथके त्यांचा शोध घेत होती.
वेत्री हे चेन्नईचे माजी महापौर सैदई दुरासामी यांचे पुत्र होत.वैत्री यांच्या कारला ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणापासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला.
हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील बचाव पथके परिसरात शोधकार्य करीत होते. त्यांनी सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सुंदर नगर येथे एक मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी तो मृतदेह बाहेर काढला तेव्हा त्याची ओळख पटली. आता मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह चेन्नईला पाठविण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top