तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारायच्या

  • भाजप खासदाराच्या
    आरोपाने खळबळ

कोलकाता- पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. आता तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांची भर पडली आहे. महुआ मोईत्रा या पैसे आणि भेटवस्तूंच्या बदल्यात उद्योगपतीचे हितसंबंध जपण्यासाठी संसदेत प्रश्न विचारायच्या,असा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे.

खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून तक्रार केली आहे. महुआ यांनी संसदेत आतापर्यंत ६१ प्रश्न विचारले आहेत.नत्यापैकी ५० प्रश्न उद्योगपतींशी संबंधित आहेत. जय अनंत देहादराई या दिल्लीतील वकिलाने यासंदर्भात सखोल तपास केला आहे. दुबे यांनी महुआ यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांची लिंकही जोडली आहे.

दुबे यांनी म्हटले आहे की, त्यांनी विचारलेले बरेचसे प्रश्न एकाच उद्योगपतीशी संबंधित आहेत. काही प्रश्न अदानी समूहाशी निगडित होते.तर महुआ यांचे उद्योगपती मित्र दर्शन हिरानंदानी हे अदानी समूहाचे प्रतिस्पर्धी आहेत. या प्रकरणांची चौकशी करण्यात यावी. केवळ संसदेचा अवमान आणि विशेषाधिकाराचा भंग नाही, तर दंड संहितेच्या १२० ए अंतर्गत गुन्हादेखील आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top