तेलंगणाच्या चंद्रयानगुट्टा मधूनएमआयएमचे ओवैसी विजयी

हैदराबाद- तेलंगणाच्या चंद्रयानगुट्टामधून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांचा विजय झाला. चंद्रयांगुट्टा अझीझ कॉलनी विधानसभा मतदारसंघ हा तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील १५ मतदारसंघांपैकी एक आहे. हा हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. तेलंगणा विधानसभेत अकबरुद्दीन ओवैसी सलग चार वेळा विजयी झाले आहेत. हाच मतदारसंघ २०१८ मध्ये ओवैसी यांनी ९५३३९ मते मिळवून जिंकला होता. त्यावेळी उपविजेते उमेदवार भाजपचे शहजादी सय्यद होते,त्यांना १५०७५ मते मिळाली. त्यापूर्वी २०१४ मध्ये देखील ओवैसी यांनी ५९,२७४ (४३.६४%) मतांनी जागा जिंकली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top