तेलंगणाच्या तरुणाचा अमेरिकेत मृत्यूमृत देह ताब्यात घेण्यासाठी आईची धडपड

हैदराबाद – तेलंगणातील एका तरुणाचा अमेरिकेत ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तीन दिवस उलटून गेल्यावरही त्याच्या कुटुंबियांना त्याचा मृतदेह ताब्यात घेता आलेला नाही.आपल्या मुलाचा मृतदेह मिळावा यासाठी त्याच्या आईने राज्य सरकारकडे मदतीची याचना केली आहे.येरुकोंडा राजेश असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याची आई नीलिमा शेतमजूर आहे. अत्यंत काबाडकष्ट करून राजेशच्या माता-पित्यांनी एकुलता एक मुलगा राजेश याला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठविले होते. त्याचा मृतदेह अमेरिकेतून भारतात आणण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे त्यांनी राज्य सरकारकडे मदत मागितली आहे.