दक्षिण अमेरिकेत विमान अपघात पॅराग्वेच्या नेत्यासह चौघांचा मृत्यू

असुनसियन

दक्षिण अमेरिकेत काल एक विमान अपघात झाला. या विमान अपघातामध्ये पॅराग्वेमधील कोलोरॅडो पक्षाचे नेते वॉल्टर हार्म्स यांच्यासह त्यांच्या पक्षातील इतर तिघांचा मृत्यू झाला. काल उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान कोसळले. पॅराग्वेचे उपाध्यक्ष पेड्रो अलियाना यांनी त्याच्या एक्स अकाऊंटवर या विमान अपघाताची माहिती देत शोक व्यक्त केला. या विमान अपघाताचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १८० किमी अंतरावर विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमान झाडावर आदळले. त्यानंतर विमानाला आग लागली आणि विमान जमिनीवर पडले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top