दलाई लामा यांच्या विरोधातील पॉस्को कायद्यांतर्गतची याचिका फेटाळली

नवी दिल्ली – तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या विरोधातील पॉस्को कायद्यांतर्गतची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज फेटाळली.लामा हे मुलासोबत खेळण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचे कृत्य आक्षेपार्ह नाही, याशिवाय लामा यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे, लहान मुलांना तोंडाने खायला घालणे ही तिबेटमधील एक परंपरा आहे जी अजूनही अस्तित्वात आहे, असे निरीक्षण मुख्य नायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना नोंदवले आहे.28 फेब्रुवारी 2023रोजी दलाई लामा यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक आठ वर्षीय मुलगा त्यांच्यासमोर नतमस्तक झाला. तेव्हा त्यांनी त्या मुलाचे चुंबन घेतले आणि स्वतःची जीभ बाहेर काढून चोख असे म्हटले . या व्हिडिओने खळबळ माजली आणि दलाई लामा यांच्या विरोधात लैंगिक छळ केल्याचा पाॅस्कोचा गुन्हा दाखल झाला. आज न्यायालयाने हा आरोप फेटाळला .लहान मुलांना तोंडाने खायला घालणे ही तिबेटमधील एक परंपरा आहे. ही परंपरा अजूनही अस्तित्वात आहे. याच परंपरेनुसार वृद्ध तिबेटी लोक आपल्या नातवंडांना भेटतात तेव्हा ते आपल्या नातवंडांना कुठली भेटवस्तू देऊ शकत नाहीत. ते विनोदाने नातवंडांना तू माझी जीभ खा, कारण माझ्याकडे दुसरे काही उरले नाही, असे म्हणतात. दलाई लामा यांनी याच परंपरेनुसार वक्तव्य केले . फक्त ते त्या मुलाला ‘खा’ ऐवजी ‘चोख’, असे म्हणाले असा युक्तीवाद करण्यात आला .

Share:

More Posts