मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी दसऱ्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. नांदेड आणि चिमूर येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभा होणार आहेत.या निवडणुकीत काँग्रेसचे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष असणार आहे. त्या अनुषंगाने राहुल गांधी यांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
