कोल्हापूर -आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप ६० जागांच्या पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही पूर्वीच्या पद्धतीने रणनीती आखा हिंदू, मुस्लिम, मराठा , ओबीसी याना एकत्र करा दिल्लीवरून आदेश आल्यामुळेच देवेंद्र फडणवीस घाबरले आहेत, असा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरही टीका केली
ज रोहित पवार कोल्हापूर दौऱ्यावर होते . यावेळी एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, फडणवीस महाराष्ट्रातील जनतेला घाबरले आहेत. महायुती एकत्र लढून ११५ जागांच्या पुढे जात नाही. हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ते उलटसुलट वक्तव्य करीत आहेत. सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईगडबडीत निर्णय घेत आहे. सरकारने वेगवेगळी समाजनिहाय मंडळे काढली आहेत. सरकारला वाटत होते की, मुंबई महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील. यामुळेच असे निर्णय घेण्यात आले. विविध महापुरुषांच्या नावावर मंडळे काढलीत. मात्र सरकारने त्यांना एक रुपयाचा निधीही दिला नाही. गोमातेचा निर्णयही सरकारने घेतला. मात्र गाईचे खरे संगोपन शेतकरी करतात. दुष्काळाच्या काळात पाणी, चारा नव्हता, त्यावेळी दुष्काळग्रस्त भागात चारा छावणी काढायला हवी होती. मात्र पाच महिने एकही छावणी राज्य सरकारने काढली नाही. गोमाता अडचणीत असताना मदत केली नाही, असा आरोपही त्याने केला.