Home / News / दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी आतिशी यांची निवड, हे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला

दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी आतिशी यांची निवड, हे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला

Leader of Opposition in the Delhi Assembly : दिल्ली विधानसभेचे अधिवेशन 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्याआधी आम आदमी पक्षाकडून विधानसभा...

By: Team Navakal

Leader of Opposition in the Delhi Assembly : दिल्ली विधानसभेचे अधिवेशन 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्याआधी आम आदमी पक्षाकडून विधानसभा विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आपच्या आमदारांकडून विरोधी पक्षनेतेपदी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांची निवड करण्यात आली आहे. दिल्ली विधानसभेत हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला 70 पैकी 22 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपचे 48 आमदार निवडून आले. भाजप नेत्या रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता आतिशी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे दिल्लीत महिला मुख्यमंत्री आणि महिला विरोधी पक्षनेत्या यांच्यामध्ये सामना रंगताना पाहायला मिळेल.

आपच्या विधिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे नेते गोपाल राय यांनी आतिशी यांची दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून नियुक्ती जाहीर केली.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी X वर (ट्विटर) आतिशी यांचे अभिनंदन करत लिहिले की, मी आतिशीजींचे सभागृहात आपच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो. दिल्लीच्या जनतेच्या हितासाठी आप एक जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावेल.’ दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया या आपच्या प्रमुख नेत्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आतिशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या