दुबईच्या राजकन्येने आणला डिव्होर्स नावाचा नवा परफ्युम

दुबई – दुबईची राजकन्या शिखा महरा हिने आपल्या घटस्फोटनंतर काही आठवड्यात डिव्होर्स नावाचा एक नवा परफ्युम बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.तिच्या महारा एम १ या ब्रॅण्ड तर्फे तिने नुकतीच या नव्या परफ्युमची घोषणा केली आहे. तिच्या अधिकृत इन्टाग्राम पानावर तिने या परफ्युमची जाहिरातही दिली असून आपल्या कंपनीचा लोगो व परफ्युमच्या बाटलीचा फोटोही टाकला आहे. तिच्या या इन्टाग्राम पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रीयांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की वास्तविक पाहाता तुम्ही घटस्फोटानंतर आणलेल्या परफ्युमला रिव्हेंज असे नाव द्यायला हवे होते. तिच्या या कृतीमुळे अनेक महिलांना नवी दिशा मिळेल असेही एकाने लिहिले आहे. जुलै महिन्यात तिने आपण आपल्या पतीला तलाक देत असल्याचे इन्टाग्रामवरच लिहिले होते. शिखा ही संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान यांची मुलगी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top