दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाने आज अधिसूचना जारी केली. इच्छुक उमेदवारांना ४ एप्रिलपर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
आज उमेदवारी अर्ज भरण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ४ एप्रिल २०२४ रोजी नामांकनांची छाननी केली जाईल. ५ एप्रिल २०२४ उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी पार पडेल. महाराष्ट्रात दुसऱ्याटप्प्यात ८ लोकसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. यात परभणी, नांदेड, हिंगोली, हे मराठवाड्यातील ३ तर बुलढाणा, अमरावती, वाशीम यवतमाळ, वर्धा, अकोला या पाच मतदारसंघांचा समावेश आहे. ​​​​​​​
दरम्यान, नियमानुसार उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडावे. हे खाते उमेदवाराला स्वत:चे नावे किंवा निवडणूक प्रतिनिधीसोबत संयुक्तरित्या काढता येईल. सदर बँक खाते नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या किमान एक दिवस अगोदर उघडलेले असणे आवश्यक असून यात केवळ निवडणुकीशी संबंधीतच व्यवहार करायचे आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top