देवगडच्या हापूस आंब्यावर थ्रीप्स रोगाचा मोठा प्रादुर्भाव

देवगड – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात सध्या प्रसिद्ध हापूस आंबा पिकावर थ्रीप्स रोगाचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे.थ्रीप्स रोगावरील महागडी औषधे फवारूनही हा रोग नियंत्रणात येत नसल्याने येथील आंबा बागायतदार हतबल झाले आहेत.तरी तालुक्यातील या औषधांची गुणवत्ता विभागाकडून चौकशी करून पडताळणी करावी अशी मागणी या आंबा बागायतदारांनी केली आहे.
जानेवारी महिन्यात या आंबा झाडांना प्रचंड मोहोर आला होता.मात्र,या मोहोरावर थ्रीप्स या रोगाने आक्रमण केले आहे.या रोगामुळे मोहोर काळा पडून कमी फलधारणा होते.देवगड तालुक्यात थ्रीप्स या रोगावरील औषधांची किंमत ४ ते ५ हजार रुपये इतकी आहे.अशा महागड्या औषधांची फवारणी करूनही हा रोग आटोक्यात येईनासा झाला आहे. कमाल आणि किमान तापमानातील फरक,ठराविक किटकनाशकांची सतत करण्यासह अन्य कारणांमुळे हा फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढला आहे.तरी शेतकर्‍यांनी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या किटकनाशकांची फवारणी करावी असे आवाहन रामेश्वर देवगडाच्या फळ संशोधन उपकेंद्राचे डॉ. विजय दामोदर यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top