देवगडच्या ९ ग्रामपंचायतीत निवडणूक आचारसंहिता लागू

देवगड – राज्‍यातील २३५९ ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणुका राज्‍य निवडणूक आयुक्‍तांनी जाहीर केल्‍या आहेत.यात सिंधुदुर्गातील २४ ग्रामपंचायतींमध्‍ये मालवण,देवगड कणकवली, दोडामार्ग,वेंगुर्ले आणि कुडाळ तालुक्‍यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.त्यापैकी देवगड तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक आचारसंहिता लागु करण्यात आली आहे. देवगड तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणुकामध्‍ये वळीवंडे, शिरवली, रामेश्‍वर, पावणाई, फणसगांव, विठलादेवी, वानिवडे, तिर्लोट, ठाकूरवाडी आदी ९ ग्रामपंचयातींचा समावेश आहे.या ९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसोबत १२ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकाही होणार असून या ग्रामपंचातीमध्‍ये कुवळे,सांडवे,आरे,विजयदुर्ग, इळये, मळेगांव,हडपिड, ओंबळ, गवाणे, गोवळ, पेंढरी, मणचे आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
निर्धारित निवडणूक कार्यक्रमानुसार या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्‍टोबर या कालावधीत दाखल करता येईल. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्‍टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येईल. त्‍याच दिवशी निवडणूक चिन्‍हांचे वाटप करण्‍यात येईल. ५ नोव्‍हेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान, तर मतमोजणी ६ नोव्‍हेंबर रोजी होणार आहे. निवडणूक होणा-या ग्रामपंचात क्षेत्रात आचार संहिता लागू झाली असल्‍याची माहिती देवगड तहसिलदार रमेश पवार यांनी प्रसिध्‍दी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top