देशभरातील ११ धान्य गोदामांचे नरेन्द्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली – “आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी जगातील सर्वात मोठी साठवण योजना सुरू केली असून या अंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यात हजारो गोदामे बांधली जातील. आज देशभरातील 1800 प्राथमिक कृषी पतसंस्था गोदामे संगणकीकृत आहेत. या माध्यमातून देशातील कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा नवा विस्तार होईल आणि शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडेल”, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केले.

देशभरातील 11 राज्यांमधील 11 प्राथमिक कृषी पतसंस्था गोदामांचे कार्यान्वयन, तसेच 500 नवीन गोदामांची पायाभरणी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

“सहकार ही केवळ एक व्यवस्था नसून ती एक भावना आहे. सहकाराची ही भावना काही वेळा व्यवसाय व संसाधनांच्या पलीकडे आश्चर्यकारक परिणाम देते. या भावनेसह सहकार ही जीवन व्यवस्था हा देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्याचा मार्ग आहे. देशात १० हजार शेतकरी उत्पादक स्थापन संघटना करण्याच्या निर्धारित लक्ष्यापैकी आतापर्यंत ८ हजार संस्था स्थापन करण्यात आल्या असून या सर्व संस्थांमध्ये महिलांना प्राधान्य देण्यात आहे.” अशी माहितीही यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी दिली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहादेखील यावेळी उपस्थित होत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top