देशातील सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री! ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक

नवी दिल्ली- इंडिया टुडे आणि सी- व्होटर्स कडून मूड ऑफ द नेशनमध्ये देशातील मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा सर्व्हे करण्यात आला. प्रत्येक राज्यात जाऊन केलेल्या या सर्व्हेत देशातील सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओडिशाचे नवीन पटनायक यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्या दहामध्येही स्थान मिळविता आलेले नाही. शिंदे हे देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत शेवटून तिसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यांना अवघी १.९ मते मिळाली आहेत.
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या दहा जणांच्या यादीत नवीन पटनायक यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांना ५२.७ टक्के जनतेने पसंती दर्शवली आहे.त्याच्या खालोखाल दुसर्‍या स्थानी योगी आदित्यनाथ आहेत, त्यांना ५१.३ टक्के मते मिळाली आहेत.तिसऱ्या क्रमांकावर हिमंता बिस्वा सरमा असून त्यांना आसामच्या ४८.६ टक्के जनतेने पसंती दर्शवली आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्रभाई पटेल चौथ्या क्रमांकावर असून त्यांना ४२.६ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे.पाचव्या स्थानी असलेले त्रिपुराचे मानिक साहा यांना ४१.४ टक्के मते मिळाली आहेत.तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ४१.१ टक्के मतांसह सहाव्या स्थानी आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सातव्या क्रमांकावर असून त्यांना ४०.१ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.वआठव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असून त्यांना ३६.५ टक्के जनतेने मते दिली आहेत. तामीळनाडूचे एम के स्टॅलिन नवव्या स्थानी असून त्यांना ३५.८ टक्के मते मिळाली आहेत. दहाव्या स्थानी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. त्यांना ३२.८ बंगालच्या जनतेने पसंती दर्शवली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यादीत हे शेवटून तिसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यांना ९८.१ लोकांनी नापसंत केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top