‘द केरला स्टोरी’ दूरदर्शनवर केरळच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध

तिरुअंनतपुरम
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले असताना आता वादग्रस्त चित्रपट ‘द केरला स्टोरी’ दूरदर्शन वाहिनीवर दाखवला जाणार आहे. याला केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी विरोध केला. चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे आणि दूरदर्शनने भाजप-आरएसएसचे प्रचारयंत्र बनू नये, अशी पोस्ट पिनाराई यांनी केली.
पिनाराई विजयन म्हणाले की, संघ चित्रपटाद्वारे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. कोणतेही तथ्य आणि पुरावे नसताना ते खोटी माहिती पसरवत आहे. सर्वात मोठे खोटी माहिती म्हणजे ३२ हजार महिलांचे धर्मांतर करुन त्यांना आयएसआयमध्ये सामील केल्याबद्दलची आहे. केरळमधील धार्मिक सलोख्याचे वातावरण बिघडवून संघ परिवाराला जातीयवादाचे विष पसरवायचे आहे
दरम्यान, गेल्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याच्या ट्रेलरलाही विरोध करण्यात आला होता. तसेच केरळमधील ३२ हजार महिलांचे धर्मांतर झाल्याचे खोटे सिद्ध करण्याचे आव्हान केरळ उच्च न्यायालयात देण्यात आले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनावरही बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायासाठी आक्षेपार्ह काहीही नसल्याचे सांगत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top