धुक्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल १५ मिनिटे उशिरा

कल्याण

मुंबई आणि उपनगरावर काल रात्री उशिरापासून आज सकाळपर्यंत धुक्याची दाट चादर पसरली होती. यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. कसारा, कर्जत, बदलापूर, आसनगाव, टिटवाळा भागातून सीएसएमटीकडे धावणाऱ्या लोकल आज १५ मिनिटे उशिराने धावल्या. परिणामी, कल्याण-डोंबिवली फलाटांवर येणाऱ्या लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली.

गेल्या अनेक दिवसांपासून रात्री १२ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत धुक्याचे वातावरणात पसरले होते. पहाटेच्या वेळी हे धुके दाट होते. त्यामुळे वाहनचालकांनाही ५ फुटांच्या पलीकडील दिसत नाही. कर्जत, कसारा, बदलापूर, टिटवाळा, आसनगाव हा परिसर डोंगराळ आहे. या भागात धुक्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे लोकलच्या मोटरमनला ५ फुटांच्या पलीकडील काही दिसत नसल्याने दिव्यांच्या प्रखरझोतात मोटारमन हळूहळू लोकल पुढे न्यावी लागते. या धुक्यात अपघाताची शक्यता असते. त्यामुळे मोटरमनला सावध राहावे लागते. यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडते, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले मध्य रेल्वेच्या वासिंद आणि टिटवाळा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सकाळी ६.३० ते ९ वाजेपर्यंत, कर्जत ते बदलापूर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सकाळी ५.३० ते सकाळी ९ वाजेपर्यंत धुके पसरल्याने मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून कसारा, कर्जत दिशेने जाणाऱ्या लोकल १५ मिनिटे उशिराने धावल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top