नरेंद्र मोदी, बायडेन, पुतिन! एआय फॅशन शो! इलॉन मस्क यांनी फोटो शेअर केले

मुंबई- टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी आज एक व्हिडीओ एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासह प्रमुख राजकीय व्यक्तींसह व्हर्च्युअल फॅशन शो दाखवला. या व्हिडिओमध्ये प्रत्येक नेत्याला कृत्रिम बुध्दी मत्तेच्या म्हणजेच एआयच्या मदतीने फॅशन रॅम्प वर वेगवेगळ्या पोषाखात चालताना दाखवले आहे.

या व्हिडिओला कॅप्शन देताना इलॉन मस्क यांनी फॅशन जगतात एआयचा काळ मोठा असेल असे म्हटले. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला पोप फ्रान्सिस यांना दाखवण्यात आले आहे. त्यांनी यामध्ये हिवाळी कपडे घातले असून त्यांच्या कपड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविधरंगी ड्रेस, गडद सनग्लासेस घातले आहे आणि त्यांच्या पेहरावाला स्टाइलिश टच दिला आहे. त्यांनी यानंतर ट्रम्प आणि बराक ओबामा यांना दाखवले. बराक ओबामा यांच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तर इलॉन मस्क यांनी त्यांच्या कंपनीचा लोगो असलेला जॅकेट घातला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतो आहे .