मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या कामात मोठ्या प्रमाणावर राज्यातील शिक्षकांना वेगवेगळी जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे मतदानाच्या २ दिवस अगोदर शाळांना सुट्टी द्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. ही मागणी सरकारने मान्य केली असून निवडणूक काळात १८ ते २० नोव्हेंबर अशी तीन दिवस राज्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे .
