निवडणुकीसाठी मुंबईहून आलेल्या अशोक सिंहना जौनपूरला अटक

लखनऊ- लोकसभा निवडणुक लढण्यासाठी मुंबईहून जौनपुरला गेलेले बसपाचे माजी नेते अशोक सिंह यांच्यासह ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अशोक सिंह यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईतील कॉंग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह हे भाजपवासी झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील जौनपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्याच विरोधात लढण्यासाठी अशोक सिंह हे मुंबईहून जौनपुरला गेले आहेत.ते यापुर्वी मायावती यांच्या बसपामध्ये कार्यरत होते.बसपा सोडून त्यांनी आपला समाज विकास क्रांती पार्टी नावाचा पक्ष काढला आहे. या पक्षातून लढण्यासाठी ते जौनपुरमध्ये दाखल झाले आहेत.मात्र पोलिसांनी आचारसंहिता भंग केल्याचे कारण पुढे करत त्यांच्यासह ७ जणांना अटक केली आहे.यातील राज कपूर,अभय यादव सुजित मिश्रा हे कांदिवली, मुंब्रा आणि वसईचे रहिवासी आहेत.या सर्वांच्या अटकेमुळे जौनपुर मतदारसंघात उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top