न्यूजक्लिकविरोधात आता सीबीआयने गुन्हा नोंदवला! दिल्लीत छापेमारी

नवी दिल्ली – केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) न्यूजक्लिकविरोधात फॉरेन कॉन्ट्रिब्युशन व्हायोलेशन अक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आज दिल्लीत दोन ठिकाणी सीबीआयने छापे टाकल्याचे समजते.
सीबीआयने न्यूज पोर्टलच्या कथित एफसीआरए उल्लंघनाबाबत एफआयआर नोंदवला आहे. आज सीबीआय अधिकार्‍यांच्या पथकाने न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्या निवासस्थानाची आणि कार्यालयाची झडती घेतली. त्यांना दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिकवर आरोप केला आहे की, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, नेव्हिल रॉय सिंघमच्या प्रचार विभागाकडून निधी स्वीकारून देशिवरोधी प्रचारासाठी खर्च केला आहे. आता सीबीआयने न्यूजक्लिकवर विदेशी चलन कायद्याचे उल्लंघन करून परदेशी निधी मिळवल्याचा आरोप केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top