पंढरपुरातील कार्तिकी एकादशीची महापूजा मुख्य सचिव करणार

पंढरपूर – विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक करणार आहेत. उद्या पहाटे २ वाजून २० मिनिटांनी ही शासकीय महापूजा होणार आहे.दरवर्षी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही महापूजा होत असते. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाल्याने ही परंपरा खंडित होणार आहे. परिणामी महापुजा करण्याची संधी सुजाता सौनिक यांना मिळाली. मंदिर समितीने विठ्ठल मंदिर आणि परिसरात रंगीबेरंगी विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर उजळला आहे. त्यासोबत भाविकांना विक्रीसाठी ८ लाख बुंदीच्या लाडूंचा प्रसाद बनवण्यात आला आहे.