पंतप्रधान नरेंद्र मोदी २० एप्रिलला परभणीत

परभणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी २० एप्रिलला परभणीमध्ये येणार आहेत. महायुतीने परभणीतून महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. जानकरांच्या प्रचारासाठी मोदी परभणीत येणार आहेत. याबाबत महादेव जानकर यांनी एका प्रचारसभेत माहिती दिली. जानकरांनी सांगितले की, नरेंद्र मोदी २० एप्रिलला परभणीत येणार आहेत. ते माझ्या प्रचारासाठी २० एप्रिल रोजी परभणीत सभा घेणार आहेत. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे इत्यादी महायुतीचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत. मी परभणीत जातीपातीच्या नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायला आलेलो आहे. इथले खासदार मिळालेला निधी खर्च करत नाहीत, ते संसदेतही जात नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top