पंतप्रधान मोदींचा आज गाझियाबादमध्ये रोड शो

गाझियाबाद

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये येथे ये णार आहेत. ते गाझियाबादमध्ये रोड शो करणार आहेत. मोदी गाझियाबाद शहराला भेट देणार असल्याने पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. त्याचबरोबर वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी ७०० हून अधिक पोलीस तैनात केले आहेत.

एडीसीपी ट्रॅफिक वीरेंद्र सिंग यांनी सांगितले की, सर्व वाहने वेगवेगळ्या मार्गाने वळवली जातील. दुपारी १ वाजल्यापासून बदललेले मार्ग सुरूहोतील. हे मार्ग कार्यक्रम संपेपर्यंत सुरूच राहतील. या काळात सर्वच ठिकाणी कडकोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल. १४ मार्गांवर खासगी वाहने थांबवण्यात येतील. रोड शोसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. दुपारी १ वाजल्यापासून अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येईल. दुपारी ३ वाजल्यापासून लहान वाहनांसाठी रस्ते बंद करण्यात येतील. त्यामुळे या मार्गाने जाणारे लोक इतर मार्गाचा वापर करू शकतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top