पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ‘यशोभूमी’चे उद्घाटन

नवी दिल्ली –

भारतात नुकत्याच पार पडलेल्या जी-२० परिषदे निमित्त दिल्लीतील प्रगती मैदानावर अत्याधुनिक सोयी असलेले ‘भारत मंडपम’ची हे सेंटर बांधण्यात आले होते. त्याच धर्तीवर आता दिल्लीत आणखी एक जागतिक दर्जाचे ‘इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर’ बांधण्यात आले आहे. ज्याला ‘यशोभूमी’ असे नाव देण्यात आले आहे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या त्याचे उद्घाटन करणार आहेत.
यशोभूमीचे पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. हे सेंटर एकूण ८.९ लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधण्यात येत असून, त्यापैकी १.८ लाख चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या सेंटरमध्ये मुख्य सभागृह तसेच ग्रँड बॉलरुमसह १५ अधिवेशन कक्ष आणि १३ मीटिंग हॉलचा समावेश आहे. एकूण ११,००० प्रतिनिधींना बसण्याची व्यवस्था आहे. या सेंटरच्या मुख्य सभागृहात एकाच वेळी ६,००० पाहुणे बसू शकतात. या सेंटरच्या छतामध्ये तांब्याचा वापर केला आहे. यासोबतच मीडिया रूम, व्हीव्हीआयपी लाउंज, व्हिजिटर इन्फॉर्मेशन सेंटर, तिकीट सेंटर आदी सुविधाही उपलब्ध असतील. प्रेक्षागृहातील लाकडी फ्लोअरिंग आणि आकर्षक भिंत हे पाहुण्यासाठी खास आकर्षण ठरेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top